ॐ कार साधना
श्री. सद्गुरूनाथ दादा यांनी साईधाम, पर्वरी, गोवा येथे गुरुशक्तीचे "शक्तिपीठ" स्थापन केले आहे. त्याला जोडून देशात व परदेशात देखील विविध ठिकाणी कार्यकेंद्र स्थापन केलेली आहेत. आपल्या घराजवळ जाण्यासाठी सोयीस्कर अशा एका कार्यकेंद्रात प्रत्यक्ष हजर राहून ओंकार साधना शिकणे.तसेच पुढे देखील येथील ओंकार साधना अनुष्ठान साठी हजर राहण्याचा प्रयत्न करावा. त्या नंतर घरी सराव करणे किंवा केंद्रात अडचणीमुळे जाता न आल्यास येथे सूचना दिल्या आहेत त्या पाळून साधना करण्याचा प्रयत्न करावा.
भूमिका
-
साधकांसाठी नियमावली/सूचना
-
धूत वस्त्र (धुतलेले कपडे), पांढऱ्या रंगाचे (फिके रंग) वापरावे. लाल/काळा रंग टाळणे - सुती वस्त्र (cotton) वापरणे.
-
लोकरीचे आसन - अमावास्येला पाण्यातून काढणे व सुकविणे.
-
पुरुषांनी पांढरा पायजमा/धोतर आणणे.
-
साधना करताना
-
आसनावर पाय न ठेवता बसणे व उठल्यावर नमस्कार करून व झटकून घडी करून ठेवणे.
-
उजवे पाऊल डाव्या मांडीवर ठेवणे/खुर्चीत बसणे.
-
पाठीचा कणा ताठ ठेवणे. सुराकडे लक्ष ठेवणे. साधना शिकताना डोळे उघडे ठेवूनच साधना शिकून घेणे व घरी आरशांसमोर सेकंद काटा असलेले घड्याळ ठेवून सराव करणे.
-
सराव करायला (घरीच करण्यास हरकत नाही) वेळेचे बंधन नाही. कुटुंबातील सदस्यांखेरीज सांगितल्याशिवाय इतरांना शिकवू नये. ही दादांची ‘ॐकार साधना’ असल्याने गुरूआज्ञा पाळणे जरूरीचे आहे.
-
सूर्योदय / सूर्यास्ताची वेळ साधनेसाठी आदर्श वेळ आहे.
-
साधना करताना "साधना-सूर" audio चा वापर करावा.
सूचना
-
ॐ काराचा उच्चार करताना, 'म' चा उच्चार तोंडाने करू नये. (मनातल्या मनात करावा) स्वरित करावा.
-
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आवाजाची पातळी (Volume) होय. आपल्याला ऐकू येईल इतकीच आवाजाची पातळी हवी.
-
कंठस्थानातून उच्चार करावा.
-
५ सेकंदात ॐ चा उच्चार पूर्ण करावा.
त्यानंतर ३ १/२ सेकंद ची विश्रांती (pause)
(१ सेकंद थांबणे + १ १/२ सेकंद श्वास आत + १ सेकंद थांबणे).
५ सेकंद - ३ १/२ सेकंद - ५ सेकंद - ३ १/२ सेकंद याप्रमाणे २१ ॐकार करणे. -
ॐकार ची १२ अंगे :-
१) उच्चार-मध्य-लय
२) स्वर- ताल-लय
३) उच्चार-विचार-आचार
४) सूर-नाद-निनाद / सूर-ताल-लय

ॐकार
-
न्यास करताना खालील सूचना पाळणे.
** न्यास शिकताना सुरवातीला डोळे उघडे ठेवणे, सराव झाल्यावर डोळे बंद करून न्यास करणे.
-
डोळे उघडे हवेत, ॐ कार १० सेकंदांचा करावा.
याप्रमाणे ५ न्यास करावे. -
-
स्पर्श मोरपिसासारखा मुलायम / मृदू हवा.
-
गती एकसमान हवी.
-
लयस्थानी पोहोचल्यावर १ सेकंद थांबून १ १\२ सेकंद श्वास आत घेत आरंभस्थानी येऊन १ सेकंद थांबणे.
हात झटक्यात वर नेऊ नये. -
हातांच्या तळव्यांचा व बोटांचा पूर्ण स्पर्श व्हायला हवा.
१० सेकंद + ३ १/२ सेकंद + १० सेकंद + ३ १/२
उच्चार pause उच्चार pause
आरंभस्थान मध्यस्थान लयस्थान
५ सेकंद ५ सेकंद
न्यास
-
मंगलाचरण - सूरात म्हणणे - प्रत्येक ओळ संपल्यावर श्वास घेणे. मध्येच श्वास घेऊ नये.
सजयति सिंधुरवदनो देवा, यत्पादपंकज स्मरणम । (श्वास घेणे)
वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयती विघ्नानाम ।। (श्वास घेणे)
त्यानंतर जयघोष करणे. -
शक्तीपीठ प्रार्थना - योग्य ठिकाणी pause व श्वास घेऊन म्हणणे.
-
मारूती स्तोत्र - सूरात म्हणणे - प्रत्येक ओळ संपल्यानंतर श्वास घेणे.
भीमरूपी महारूद्रा, वज्रहनुमान मारूती। (श्वास घेणे)
वनारी अंजनीसुता, रामदुता प्रभंजना ।। (श्वास घेणे) -
ॐ कार - ५ सेकंद २१ वेळा
-
न्यास - १० सेकंद ॐ कार - प्रत्येक न्यास ५ वेळा
एकूण ५ न्यास करणे. -
नामस्मरण - १०८ वेळा
-
महामंत्र - २१ वेळा
-
तारकमंत्र - २१ वेळा
** मंगलाचरणापासून तारकमंत्रापर्यत संपूर्ण साधना एकाच सूरात हवी.
ॐकार - साधना क्रम, संथा & संख्या
नामस्मरण - १०८ वेळा - प्रत्येकी ५ सेकंदाचे
(श्वास आत घेणे) (श्वास आत घेणे)
-
"श्री" चा उच्चार स् री हवा (SRI हवा), श् री नको (SHRI नको).
-
"थ" चा उच्चार हळुवार, मृदू हवा. स्फोटक नको.
-
PAUSES
'श्री' नंतर श्वास आत घेणे. साईनाथाय नमः म्हणून श्वास पूर्ण न सोडता पुढचा ॐ श्री म्हणून मग श्वास घेणे.नाममाला तयार करणे.
ॐ श्री (श्वास आत) साईनाथाय नमः ॐ श्री (श्वास आत) साईनाथाय नमः ॐ श्री (श्वास आत)प्रत्येक नामस्मरण ५ सेकंदाचे. -
नामस्मरण प्रेमळ, मुलायम, हळुवार उच्चारण करीत करावे.

ॐ श्री साईनाथाय नमः ॐ श्री
नामस्मरण
महामंत्र - २१ वेळा
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके (श्वास घेणे)
शरण्ये त्र्यंबके गौऽरी, नारायणी नमोऽस्तुते (श्वास घेणे)
-
१ ओळ संपल्यावर श्वास घेणे. सूरात म्हणणे. उच्चाराकडे लक्ष देणे.
-
जोडाक्षरातील 'य' चा उच्चार व्हायला हवा. गौरी उच्चार करताना "गौऽरी" असा हवा.

महामंत्र संथा पद्धती
तारक मंत्र - २१ वेळा
-
शांत, सुरात, संथ लयीत म्हणावा.
-
जेवढा शांत व संथ होईल तेवढा प्रभावी होतो. यास वेळेचे बंधन नाही. सूराचे आहे.
-
फक्त पारमार्थिक लाभासाठी हा मंत्र आहे.
-
विश्वकल्याणासाठी व आत्मकल्याणासाठी हा मंत्र आहे. सूराचे अवधान ठेवूनच म्हणावा.
-
१३ अक्षरी दीर्घ असल्याने २ pause घ्यावे लागतात. त्यावेळी श्वास घेणे.

