top of page
  • Facebook

ग्रंथ आणि साहित्य

साई स्मृति

समाजसेवी संस्थांना मदत

Sai Smruti

साई स्मृति ही वास्तू श्री सद्गुरुनाथ दादा यांनी स्थापन केलेल्या शक्तिपीठाचे "लय" तत्त्व धारण केलेली पवित्र वास्तू आहे. श्री सद्गुरुनाथ दादा म्हणजेच श्री दत्तात्रय भास्कर भागवत यांचा जन्म सातारा येथे झाला .शक्तिपीठ स्थापना हे त्यांच्या जीवनाचे ध्येय,अवतार कार्य होते .गोवा (पर्वरी) येथे विश्व शक्ति- ब्रह्मांड शक्ति- निसर्गशक्ति - ओंकारशक्ति या शक्तीची भूगर्भात त्यांनी स्थापना केली. विश्वातील सर्व धर्मातील भक्त भाविक यांना जीवनात चिरंतन ईश्वरी कृपेचा लाभ होईल अशी तरतूद त्यांनी त्याद्वारे केली. श्री सद्गुरुनाथ दादा हे स्वतः दत्त शक्तीचे अवतार होते. श्री जगद्गुरु साईनाथ महाराज (दहावे नाथ) यांच्या कृपेने दत्त शक्ती, नाथ शक्ती तसेच विविध सूफी  विभूती यांच्या कृपेने 

साईधाम गोवा, पर्वरी येथे शक्तिपीठाचे "उत्पत्ती तत्त्व" तत्त्व
द्वारकामाई, पुणे येथे शक्तिपीठाचे  "स्थिती तत्त्व"  व
साई स्मृति,मुंबई येथे शक्तिपीठाचे "लय तत्त्व"..

अशी शक्ती धारणा सद्गुरुनाथ दादा यांनी केली आहे. विश्वशांति व मानवता धर्माची स्थापना हे श्री सद्गुरुनाथ दादा यांच्या जीवनाचे ध्येय होते व त्यासाठी भारतात व इतरत्र ओंकार शक्तीची ,गुरुशक्तीची कार्य केंद्रे त्यांनी स्थापन केली. मानवता धर्म हा या मार्गाचा प्रमुख धर्म असल्याने येथे सर्व धर्म ,जात ,पंथ असलेल्या भक्तांना गुरु प्रेरणेने ओंकार साधना शिकविली जाते. तसेच जीवनातील अडीअडचणी यांबाबतचे मार्गदर्शन केले जाते.ज्योतिष, पत्रिका, कुंडली, भविष्य इत्यादी न बघता भविष्य घडविण्याची किमया व निरंतर तरतूद या मार्गात श्री सद्गुरुनाथ दादा यांनी सिद्ध करून ठेवली आहे.कर्मकांड, रुढी, अंधश्रद्धा यांचा त्याग करून डोळस भक्ती वाढवून विज्ञाननिष्ठ व जागृत साधक घडवून सदाचरणी व समाजोपयोगी मानव घडवून संस्थाभिमुख वाटचाल करणे ही श्री सद्गुरुनाथ दादा यांच्या मार्गाची खासियत येथे आहे!!!

साई स्मृति बद्दल

​ज्यावेळी गुरूंना ईश्वरप्रेरित कार्य करावयाचे असते त्यावेळी त्यांचा त्या कार्याबद्दलचा आराखडा ठरलेला असतो. मानवजातीच्या कल्याणार्थ हा एक योग असतो. योग व योगायोग या दोन शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. योगामध्ये ठामपणा असतो. त्यामध्ये ईश्वराची इच्छा असते. त्यातून इतरांच्या कल्याणार्थ काहीतरी घडणार हे निश्चित असते. योगायोगामध्ये कोणत्याही प्रकारची निश्चितता नसते. त्यातून वेगळे असे काहीच निष्पन्न होत नाही. असाच योग 'साई स्मृति'च्या दादांच्या मान्यतेत घडून आला होता. जोगेश्वरीत आज ज्या ठिकाणी 'साई-स्मृति'चे स्थान आहे ती भूमी पवित्र पावन अशीच आहे.

 

या ठिकाणी पूर्वी टाकीमहाराज नावाचे एक थोर संत होऊन गेले. त्यांनी या परिसरात 'सद्भक्ती मंदिर' हे दत्तांचे स्थान स्थापन केले आहे, तसेच रामेश्वर मंदिर या शंकराच्या मंदिराची स्थापनाही त्यांनीच केली आहे. या मंदिरातल्या शिवलिंगाची स्थापनाही त्यांच्याच हस्ते झालेली आहे. या दोन्ही ठिकाणी रोजची पूजाअर्चा, आरती, भजन इत्यादी चालूच असते. अशा या पावन भूमीवर आपले गुरू श्रीसाईनाथमहाराज यांचे स्थान असावे असे दादांना मनोमन वाटले असेल म्हणूनच 'साई-स्मृति' या केंद्रासाठी त्यांनी जोगेश्वरीतील या भूमीची निवड केली.

Sai Smruti

|| ॐ श्री साईनाथाय नमः ||

Sai Smruti Karyakendra
3 Gurukrupevin Mukti Sangeet Aarti
3 Gurukrupevin Mukti Sangeet Aarti
03:43
9 Jaijaikar Kara Sangeet Aarti
06:50
8 Moodh Das Mee Sangeet Aarti
04:39
7 Premal Datta Sangeet Aarti
03:14
bottom of page