top of page
  • Facebook
WhatsApp Image 2025-10-02 at 11.22.21 PM.jpeg

|| ॐ श्री साईनाथाय नमः || * || ॐ श्री सद्गुरुनाथ दादाय नमः || *

श्री. सद्गुरूनाथ दादा

साई स्मृति

समाजसेवी संस्थांना मदत

Sai Smruti

साई स्मृति ही वास्तू श्री सद्गुरुनाथ दादा यांनी स्थापन केलेल्या शक्तिपीठाचे "लय" तत्त्व धारण केलेली पवित्र वास्तू आहे. श्री सद्गुरुनाथ दादा म्हणजेच श्री दत्तात्रय भास्कर भागवत यांचा जन्म सातारा येथे झाला .शक्तिपीठ स्थापना हे त्यांच्या जीवनाचे ध्येय,अवतार कार्य होते .गोवा (पर्वरी) येथे विश्व शक्ति- ब्रह्मांड शक्ति- निसर्गशक्ति - ओंकारशक्ति या शक्तीची भूगर्भात त्यांनी स्थापना केली. विश्वातील सर्व धर्मातील भक्त भाविक यांना जीवनात चिरंतन ईश्वरी कृपेचा लाभ होईल अशी तरतूद त्यांनी त्याद्वारे केली. श्री सद्गुरुनाथ दादा हे स्वतः दत्त शक्तीचे अवतार होते. श्री जगद्गुरु साईनाथ महाराज (दहावे नाथ) यांच्या कृपेने दत्त शक्ती, नाथ शक्ती तसेच विविध सूफी  विभूती यांच्या कृपेने 

साईधाम गोवा, पर्वरी येथे शक्तिपीठाचे "उत्पत्ती तत्त्व" 
द्वारकामाई, पुणे येथे शक्तिपीठाचे  "स्थिती तत्त्व"  व
साई स्मृति,मुंबई येथे शक्तिपीठाचे "लय तत्त्व"..

अशी शक्ती धारणा सद्गुरुनाथ दादा यांनी केली आहे. विश्वशांति व मानवता धर्माची स्थापना हे श्री सद्गुरुनाथ दादा यांच्या जीवनाचे ध्येय होते व त्यासाठी भारतात व इतरत्र ओंकार शक्तीची ,गुरुशक्तीची कार्य केंद्रे त्यांनी स्थापन केली. मानवता धर्म हा या मार्गाचा प्रमुख धर्म असल्याने येथे सर्व धर्म ,जात ,पंथ असलेल्या भक्तांना गुरु प्रेरणेने ओंकार साधना शिकविली जाते. तसेच जीवनातील अडीअडचणी यांबाबतचे मार्गदर्शन केले जाते.ज्योतिष, पत्रिका, कुंडली, भविष्य इत्यादी न बघता भविष्य घडविण्याची किमया व निरंतर तरतूद या मार्गात श्री सद्गुरुनाथ दादा यांनी सिद्ध करून ठेवली आहे.कर्मकांड, रुढी, अंधश्रद्धा यांचा त्याग करून डोळस भक्ती वाढवून विज्ञाननिष्ठ व जागृत साधक घडवून सदाचरणी व समाजोपयोगी मानव घडवून संस्थाभिमुख वाटचाल करणे ही श्री सद्गुरुनाथ दादा यांच्या मार्गाची खासियत येथे आहे!!!

साई स्मृति बद्दल

​ज्यावेळी गुरूंना ईश्वरप्रेरित कार्य करावयाचे असते त्यावेळी त्यांचा त्या कार्याबद्दलचा आराखडा ठरलेला असतो. मानवजातीच्या कल्याणार्थ हा एक योग असतो. योग व योगायोग या दोन शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. योगामध्ये ठामपणा असतो. त्यामध्ये ईश्वराची इच्छा असते. त्यातून इतरांच्या कल्याणार्थ काहीतरी घडणार हे निश्चित असते. योगायोगामध्ये कोणत्याही प्रकारची निश्चितता नसते. त्यातून वेगळे असे काहीच निष्पन्न होत नाही. असाच योग 'साई स्मृति'च्या दादांच्या मान्यतेत घडून आला होता. जोगेश्वरीत आज ज्या ठिकाणी 'साई-स्मृति'चे स्थान आहे ती भूमी पवित्र पावन अशीच आहे.

 

या ठिकाणी पूर्वी टाकीमहाराज नावाचे एक थोर संत होऊन गेले. त्यांनी या परिसरात 'सद्भक्ती मंदिर' हे दत्तांचे स्थान स्थापन केले आहे, तसेच रामेश्वर मंदिर या शंकराच्या मंदिराची स्थापनाही त्यांनीच केली आहे. या मंदिरातल्या शिवलिंगाची स्थापनाही त्यांच्याच हस्ते झालेली आहे. या दोन्ही ठिकाणी रोजची पूजाअर्चा, आरती, भजन इत्यादी चालूच असते. अशा या पावन भूमीवर आपले गुरू श्रीसाईनाथमहाराज यांचे स्थान असावे असे दादांना मनोमन वाटले असेल म्हणूनच 'साई-स्मृति' या केंद्रासाठी त्यांनी जोगेश्वरीतील या भूमीची निवड केली.

Sai Smruti

ओंकार चाचा  (​डॉ. महारुद्र गोविंद वाघ) 

०५\ऑक्टोबर\१९३७

आश्विन शुद्ध १ ​(जन्म दिन)

१६\मे\२०१०

अक्षय तृतीया ​(पुण्य तिथी)

|| ॐ श्री साईनाथाय नमः ||

|| श्री. सद्गुरुनाथ दादा ||

12.jpg
2.jpg

सौ. मनोरमाबाई भागवत
(आई)

1.jpg

  श्री. भास्करराव भागवत
(वडिल)

4.jpg

​श्री. भास्करराव भागवत यांची प्रथम पत्नी दिवंगत झाल्यावर त्यांना विरक्ती आली व परत विवाह न करण्याचा त्यांनी निश्चय केला. एकदा साताऱ्यातच असलेल्या  पीरवाडी येथे श्री. कोंडिबा महाराज यांच्या दर्शनाला ते गेले. श्री. कोंडिबा महाराज हे नाथपंथी संत होते. त्यांनी श्री.भास्करराव यांना पुन्हा विवाह करण्यास सांगितले, आशीर्वादाचे श्रीफळ दिले व सांगितले “तुला पहिला मुलगा होईल त्याचे नाव दत्तात्रय ठेव”...

श्री. कोंडिबा महाराज

5.jpg

​त्या प्रमाणे घटना घडून श्री. सदगुरुनाथ दादा यांचा जन्म झाला. लहानपणी सदगुरुनाथ दादा यांना श्री. तेली महाराज या संतांचा सहवास घडला व त्यांच्या कृपेने त्यांना परमार्थाची दिशा मिळाली.. श्री. तेली महाराज यांनी त्यांचे  शिक्षणामधील लक्ष उडवून पारमार्थिक कार्यासाठी तयार केले. त्यांच्याकडून दादांना “अन्न-ब्रह्म” शक्तीची प्राप्ती झाली. पुढे त्यातूनच पारमार्थिक कृपा शक्तीची प्राप्ती झाली...

श्री. तेली महाराज

8.jpg

दादांचे वडिल दत्त भक्त होते. त्यामुळे दादा देखील काही काळ गुरुचरित्र पारायण करीत. गावात डोंगरावर श्री. भैरवनाथांचे मंदिर आहे. दादांच्या वडिलांना श्री. भैरवनाथांनी स्वप्न दृष्टांत दिला व त्या प्रमाणे दादांना बाल वयातच संध्याकाळी मंदिरात जाऊन दिवा लावण्याची सेवा मिळाली. पुढे श्री. भैरवनाथांच्या मूर्ती मधून दादांना “ॐ कार” ध्वनि ऐकू येऊ लागला. येणारा ॐ कार लक्षपूर्वक ऐकून घरी रात्री त्याचा ते नित्य अभ्यास करू लागले. अशा प्रकारे बालवयातच साक्षात श्री. शंकराचे अवतार असलेल्या श्री. भैरवनाथ यांच्या कडून त्यांना “ॐ” काराची प्राप्ती झाली...

श्री. भैरवनाथ

9.jpg

मोठेपणी दादांनी उदरनिर्वाहासाठी नोकरी धरली. त्यासाठी त्यांना पुण्याला यावे लागले. एकदा साताऱ्याला श्री. भैरवनाथांचे दर्शनासाठी गेले असता श्री. भैरवनाथांनी त्यांना विचारले “परम पूज्य साईबाबांचे नाव ऐकले आहेस का ?”, नाव ऐकले आहे म्हटल्यावर “भविष्यात त्यांची सेवा कर व आज्ञापालन कर. त्यात तुझे व इतरांचे कल्याण होईल” असे श्री. भैरवनाथांनी सांगितले.

 

दादा नंतर परत पुण्याला गेले व घरी श्री. साईबाबांची तसबीर आणून तिची सेवा सुरू केली. त्या सेवेतून दादांना भूत-भविष्य समजू लागले व लोकांना अडी-अडचणी मध्ये मार्ग दर्शन करू लागले. पुढे श्री. साईबाबांचे दादांना दर्शन घडले तेव्हा दादांनी “माझ्या कडून जगाची पूर्ण सेवा घडू दे व हे जग सुखी कसे होईल यासाठी मला आपण सद्गुरु रूपाने मार्गदर्शन करा” अशी विनंती श्री. साईबाबांकडे केली...

श्री. दादा

6.jpg

विश्वशांती व मानवकल्याण याचा ध्यास त्यांना लागला. त्यातून त्यांना श्री. साईबाबांनी कृष्णाकाठी असलेल्या “औदुंबर” या श्री. दत्त क्षेत्री जाऊन उपासना करण्यास सांगितले. या ठिकाणी दादा अडीच वर्षे ओवरीत राहिले , खडतर तप केले. तेथे त्यांना प. पू. श्री हाजी मलंग बाबांचे (मलंग गड, कल्याण, महाराष्ट्र) यांचे दर्शन व मार्गदर्शन मिळू लागले. त्यातूनच पुढे इतर पुण्य सूफी संतांचे मार्गदर्शन मिळू लागले. पुढे श्री. पंत महाराज बाळेकुंद्री (बेळगांव, कर्नाटक) येथे जाण्याची त्यांना आज्ञा झाली. तसेच श्री. गोरक्षनाथ (बत्तीस शिराळा, सांगली) यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून दादांना त्या स्थानी जावे लागले...

श्री. दादा व श्री. पंत महाराज
बाळेकुंद्री

7.jpg

श्री. नृसिंह सरस्वती 

पुढे श्री. नृसिंह सरस्वती (नरसोबावाडी, सांगली) यांच्याकडे दादांना जाण्याची आज्ञा झाली व तेथे त्यांना विश्वकल्याणासाठी “ॐ कार” प्राप्ती झाली. 

लोकांच्या वंशातील दोष दूर करण्यासाठी त्यांनी “वंश विमोचन” विधी केला. त्यात मलंग गडावर, काही कार्यकेंद्रांवर व पुढे वाडी येथे हवने केली व महारुद्रयाग केला. या सोबतच कर्म विमोचन, ऋण मोचन विधी केले व भक्तांना गुरु दीक्षा दिल्या. हे सर्व दादांनी लोककल्याणासाठी निःस्वार्थ हेतूने व गुरू आज्ञेने सर्व यम-नियम, शास्त्र, बंधने पाळून केले...

10.jpg


श्री. दादा व सौ. वहिनी
शक्तिपीठ पूजन

गोवा, पर्वरी येथे भूगर्भात शक्तिपीठ स्थापना केली. ही शक्ती विश्वात प्रवाहित होण्यासाठी विविध कार्यकेंद्रे स्थापन केली. भक्तांना दैनंदिन प्रार्थना, ॐकार साधना दिली. तसेच श्री. पंत महाराज (बाळेकुंद्री) यांच्या निवडक आरत्या घेऊन त्याला चाली लावल्या व त्या मध्ये नाथांची सिद्ध – सिद्धांत पद्धती, दीक्षा धारण करून आरती साधना सारखी सोपी परंतु प्रभावी अशी निराकरण पद्धती दिली... 

कौटुंबिक जिव्हाळ्याचे प्रेम घरा घरात रहावे व सर्वांना ईश्वर कृपा लाभावी यासाठी पूजन करण्यासाठी प्रतिमा सिद्ध करून दिल्या. घरगुती पद्धतीची, कमी खर्चिक पूजा पद्धती शिकवून भक्ति भावना वाढविली व शिस्तबद्ध परमार्थ मार्ग उभा केला.पैशाची बचत करून चांगल्या कार्यासाठी विविध समाज उपयोगी कार्यासाठी या पैशाचा विनियोग होईल अशी कार्यपद्धती आखून दिली. 

 

गुरु आज्ञेने श्राद्धविधी, ज्योतिष, पत्रिका यांवर जास्त भर न देता गुरुभक्ती व गुरुकृपाशीर्वाद यांची साथ घेऊन अंधश्रद्धा, रुढी यांचा त्याग करून सश्रद्ध गुरुभक्त, विज्ञानवादी, मानवतावादी नव मनुष्य घडवून सामुदायिक मार्गाने जाणारा शिस्तबद्ध परमार्थ उभा केला. 

या परमार्थमार्गावर सद्गुरू दादा यांनी स्थापना केलेली विविध कार्यकेंद्रे दीपस्तंभा सारखी मार्गदर्शन करीत आहेत व पुढे देखील ती निरंतर कार्य करीत राहातील ही सर्व गुरुभक्तांची खात्री आहे ... !

|| दादा परम समर्था, दीन दयाळा प्रभो जगन्नाथा ||

|| आलो शरण तुला मी दीन, तुझ्या ठेवितो पदी माथा ||

bottom of page